IBPS Clerk Recruitment 2024
IBPS Clerk Recruitment 2024: तुम्ही देखील सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सध्या सरकारी बँक मध्ये भरती निघालेली आहे. IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 6128 जागा निघालेल्या आहेत. पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीचे नोटिफिकेशन नुकतेच जारी केलेले आहे. अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज करावा. लक्षात असू द्या यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे. याची भरतीची संपूर्ण डिटेल्स खाली दिलेली आहे.
पदाचे नाव
लिपिक (Clerk)
शैक्षणिक पात्रता
(1) कोणत्याही शाखेतील पदवी. (2) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
जागा
यासाठी एकूण 6128 इतक्या रिक्त जागा आहेत.
अर्जं फी
यासाठी अर्ज फी जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-] इतकी आहे
वयोमर्यादा
यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] इतके असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
वेतन
यामध्ये IBPS लिपिकाचे मूळ वेतन दरमहा 19,900 ते 47920 रुपये आहे.सोबत वेतनामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता यांचा समावेश होतो. सुरुवातीला सामील झालेल्यांसाठी IBPS लिपिक पगाराशी संबंधित रोख रक्कम रु. 29453 इतकी आहे.
नोकरीचे ठिकाण
या पदांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख
21 जुलै 2024
परीक्षा
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024
मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2024
1 thought on “IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची निघाली भरती; जागा 6128, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी”