Mukhyamantri Vayoshri Yojana : 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रु. महिना, लवकर अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mukhyamantri vayoshri yojana : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजनेनंतर आता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेले आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्रातील 65 वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला तीन हजार रुपये सुरु होणार आहेत. या लेखामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल संपूर्ण माहिती जसे की योजनेसाठी असणारी पात्रता, लागणारे कागदपत्रे, यासाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळणार आहे त्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

 

 

What is mukhyamantri vayoshri yojana?

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे?

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमांत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्षावरील अंदाजे एकूण लोकसंख्या 10-12 टक्के ज्येष्ठ नागरिक(1.25-1.50 कोटी) आहेत. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना काही कारणास्तव अपंग अपंगत्व येत आहे. त्या अपंगतचा अपंगत्वाचा सामना त्यांना करावा लागतो.सदर बाब विचारात घेवून केंद्र शासनाने दारिद्रय रेषेखालील संबंधित दिव्यांग/दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारिरीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने/उपकरणे पुरविण्याची वयोश्री योजना सुरु केली आहे.

हे देखिल वाचा  Ladki Bahin Mothi Update लाडकी बहिण मोठी अपडेट्स

 

 

Mukhyamantri vayoshri yojana GR

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा GR

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी व गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे, याची काळजी घेऊन यासाठी उपकरणे प्रदान करून देण्यात येणार आहे, तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता आणि मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी रु. 3000/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट (D.B.T.) प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत.

 

 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ध्येय व उद्दिष्ट

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी रु. 3000/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे.

हे देखिल वाचा  Aadhar dawnlaoad kara आधार कार्ड डाऊनलोड करा

 

 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वरूप

सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/+ दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने/ उपकरणे खरेदी करता येतील.

• चष्मा

• श्रवणयंत्ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर

• फोल्डिंग वॉकर

• कमोड खुर्ची

• नि-ब्रेस

• लंबर बेल्ट

• सर्वाइकल कॉलर इ.

 

 

Required documents for mukhyamantri vayoshri yojana?

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?

• आधारकार्ड / मतदान कार्ड

• राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स

• पासपोर्ट आकाराचे 2 फोटो

• स्वयं-घोषणापत्र

• शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे

 

 

Eligibility of mukhyamantri Vayoshri Yojana?

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची पात्रता?

 

• सदर योजनेतंर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि.31.12.2023 अखेर पर्यन्त वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील). ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल, आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील, तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल.

• लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.

हे देखिल वाचा  Post Office RD Scheme 2025 | सर्वात भारी योजना ₹2000 जमा केल्यावर मिळणार 1 लाख 42 हजार 732 रुपये, पूर्ण माहिती बघा...

• उत्पन्न मर्यादा – लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.2 लाखाच्या आत असावे. (Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online) याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.

• सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र दोषपूर्ण/अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.

• पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात रु. 3000/- थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करुन संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम (CPSU Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.

• निवड / निश्चित केलेल्या जिल्हयात, लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असतील.

GR Pdf Download

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now